मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य देत आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक सोमवारी (ता.२४) आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (ता. २५) घेण्यात येणार आहे.