
मुंबई : ‘महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले, याची राहुल गांधी यांच्या लेखातून मांडणी केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय बळावला असल्याने या गंभीर प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित होते, मात्र भाजपकडून त्याची उत्तरे दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाले यावर शिक्कामोर्तब करणारे आहे,’’ अशा शब्दात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी भाजपवर हल्लाबोल केला.