Congress: राजकारण तापणार! बदलापूर घटनेवरून काँग्रेस प्रवक्त्याने केला मराठी माणसाचा अपमान, पाहा व्हिडिओ

Congress Alok sharma insulted Marathi people: भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला हे देखील चर्चेमध्ये सहभागी होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आलोक शर्मांनी हे वक्तव्य केलं.
Congress
Congress
Updated on

नवी दिल्ली- काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी एका टीव्ही शोमधील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी कथितरित्या मराठी माणसाबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं आहे. बदलापूरमध्ये एका मराठी माणसाने बलात्कार केला म्हणून त्याला देखील वाचवणार का? असा प्रश्न आलोक शर्मा यांनी केला होता.

'आज तक'मधील डिबेट शोदरम्यान हे वक्तव्य करण्यात आले आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला हे देखील चर्चेमध्ये सहभागी होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आलोक शर्मांनी हे वक्तव्य केलं. अनेकांनी आलोक शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com