esakal | 'ओबीसी आरक्षण कायम ठेवूनच निवडणुका घेणे हीच काँग्रेसची भूमिका'
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

'ओबीसी आरक्षण कायम ठेवूनच निवडणुका घेणे हीच काँग्रेसची भूमिका'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : ओबीसी आरक्षण (OBC reservation) कायम राहावे ही काँग्रेसची पूर्वीपासूनची भूमिका आहे. राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (local bodies election) घ्याव्यात. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, ही काँग्रेसची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (congress president nana patole) म्हणाले. ते आज मुंबईत बोलत होते.

हेही वाचा: शिवसेना संपर्क प्रमुखांचे पंख छाटले; घ्यावी लागणार चौघांची संमती

ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पिरिकल डेटासंदर्भात निर्णय होईल तेव्हा काय करायचं हे ठरविलं जाईल. मात्र, आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये. भाजपने हे आरक्षण काढलेले आहे. त्याचा परिणाम ओबीसी समाजाला भोगावा लागत आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपला ओबीसी आरक्षणाबाबत काही देणे-घेणे नाही हे त्यांच्या कर्तृत्वावरून दिसत आहे. आरक्षणाची थट्टा करणे योग्य नाही. चूक करायची आणि ओबीसी आरक्षण हिसकावून घ्यायचं. ओबीसी समाजाच्या तोंडून घास हिरावून घ्यायचा आणि वरून ओबीसीसाठी आम्हीच आहोत, असं दाखविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. ओबीसी समाजाने आता त्यांना चांगल्याप्रकारे ओळखले आहे आणि त्यांची जागा दाखविण्याचे काम समाज करणार आहे, असेही नाना म्हणाले.

दरम्यान, आज ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक आहे. त्यामध्ये काँग्रेस ओबीसीसंदर्भात राजकीय आरक्षणाच्याबाबत आग्रही राहणार आहे. केंद्र सरकार जातीनिहाय जनगणनाबाबत कसा विरोध करत आहे? हे सगळ्यांनीच पाहिलं. त्यामुळे पुतना मावशीचे प्रेम हे ओबीसी समाजाबाबत भाजप दाखवत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लसीकरणासंदर्भात चुकाचे धोरण अवलंबले आहे, असाही आरोप करण्यात आला होता.

loading image
go to top