Ashok Chavan : महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचे कटकारस्थान - अशोक चव्हाण

चव्हाण म्हणाले, ‘‘कर्नाटक राज्यात भाजपचा अतिरेक झाला. यामुळे तेथील जनतेने भाजपचे सरकार पाडले.
conspiracy to create communal riots in Maharashtra  congress Ashok Chavan
conspiracy to create communal riots in Maharashtra congress Ashok ChavanSakal
Updated on

जत/ डफळापूर (जि.सांगली) : महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचे कटकारस्थान सुरू आहे. सांगलीतील काही लोक महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबद्दल बेताल बोलत सुटले आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये दुही करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण जनता हे सगळं पाहात आहे. यांचे सगळे प्रयोग आता पुढच्या काळात फसणार आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

डफळापूर येथे काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, ‘‘कर्नाटक राज्यात भाजपचा अतिरेक झाला. यामुळे तेथील जनतेने भाजपचे सरकार पाडले. तसाच गलिच्छ प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. शिवसेना फोडली, तेव्हा सत्ताधाऱ्यांचे दीडशेपेक्षा अधिक सदस्य होते. मग राष्ट्रवादी का फोडली?,

वास्तविक सरकार अस्थिर असल्याचे भाजपला कळले असावे, यासाठीच राज्यात असे वेगवेगळे प्रकार सुरू आहेत. राज्यात शेवटचा मतदारसंघ असलेल्या जतमधील शेतकऱ्यांना पाण्यासाठी आक्रोश करावा लागतो, कर्नाटकात जाण्याची भावना व्यक्त करावी लागत असेल तर ही बाब खरच दुर्दैवी आहे. शासनाने तात्काळ बैठक घेऊन जतला न्याय दिला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com