
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय झालेला नसला तरी शासकीय/निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने घेण्यावर मात्र राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. या कर्मचाऱ्यांना वयाच्या ६५ वर्षांपर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत सरकारला आपली सेवा देता येणार आहे.