
अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळी गोंधळाचे गालबोट लागले. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीतच हा गोंधळ झाला.