teacher suspended
sakal
पुणे - राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत ‘कॉपी’ प्रकरणांनी शंभरी ओलांडली असून, आतापर्यंत १०९ कॉपी प्रकरणे घडली आहेत. तर, छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अखत्यारीतील पाच आणि अमरावती विभागीय मंडळाच्या एका परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आली आहेत. सामूहिक कॉपीप्रकरणी आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.