esakal | Maharashtra Corona Update: कोणत्या जिल्ह्यांत किती रुग्ण?
sakal

बोलून बातमी शोधा

Covid care center

Maharashtra Corona Update: कोणत्या जिल्ह्यांत किती रुग्ण?

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Maharashtra corona cases : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत आहे. सोमवारी राज्यात सहा हजार 270 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील तीन महिन्यात राज्यातील मृताची संख्या पहिल्यांदाच 100 च्या आत आली आहे. राज्यातील सर्वच विभागांमधील नवी रुग्णसंख्या घटली. तसेच सहा जिल्ह्यांमधील नव्या रुग्णांची संख्या एकेरी झाली आहे. एक नक्की आहे, विदर्भाचा पूर्व भाग हा झपाट्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा (अपवाद बीड, उस्मानाबाद), उत्तर महाराष्ट्र हे तीन विभाग रुग्णसंख्येत उतार दाखवत आहेत. एकेरी रुग्णसंख्येच्या जिल्ह्यांपैकी तीन जिल्हे विदर्भातील, एक मराठवाडा तर दोन उत्तर महाराष्ट्रातील आहेत.

मागच्या 24 तासांत राज्यात 6,270 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 13,758 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 59,79,051 रुग्ण आढळले असून 57,33,215 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 94 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात 1,18,313 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1,24,398 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,96,69,693 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

राज्यातील कोरोना स्थिती -

loading image