33 हजार होमगार्ड लोकांचे दोनशे कोटी थकले ! कोरोनामुळे 45 वर्षांवरील 12 हजार होमगार्ड लोकांना नाही ड्यूटी 

तात्या लांडगे
Friday, 6 November 2020

मानधन मागणीचा पाठविला प्रस्ताव
नाव्हेंबर, डिसेंबर 2019, जानेवारी 2020 आणि त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्‍टोबरपर्यंत होमगार्डना मानधन मिळाले नाही. दिवाळीपूर्वी मानधन मिळावे, यादृष्टीने पोलिस महासंचालक कार्यालयाकडे निधीची मागणी केली आहे. 
- बाबुराव घाडगे, प्रशासकीय अधिकारी, होमगार्ड, सोलापूर 

सोलापूर : राज्यातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस सेवा बजावणारे राज्यातील 33 हजार होमगार्ड तीन महिन्यांपासून मानधनाविनाच काम करीत आहेत. तत्पूर्वी, नोव्हेंबर-डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 या काळातील मानधनही त्यांना मिळालेले नाही. होमगार्डचे मानधन देण्यासाठी 203 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी पोलिस महासंचालकांकडे करुनही यंदा खर्च वाढल्याने त्यावर निर्णय झालेला नाही.

 

ठळक बाबी...

 • कोरोनामुळे 45 वर्षांवरील 12 हजार होमगार्ड लोकांना नाही ड्यूटी
 • सध्या राज्यात आहेत 45 हजार 727 होमगार्ड; चारशेहून अधिकजण बाधित
 • दरवर्षी होमगार्ड लोकांच्या मानधनासाठी लागतात 45 कोटी
 • 175 कोटींचे वार्षिक बजेट कोरोनामुळे पोहचले 350 कोटींवर

 

कोरोनाचा सर्वाधिक धोका 50 वर्षांवरील व्यक्‍तींना असल्याने पोलिस महासंचालकांनी 46 वर्षांवरील होमगार्ड लोकांना ड्यूटीच दिली नाही. त्यामुळे आतापर्यंत 400 हून अधिक होमगार्डनी कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने कोरोनामुळे एकाही होमगार्डचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, गणेशोत्सव, नवरात्र महोत्सवात प्रत्येकी दहा दिवसांची, आषाढी, कार्तिकी वारी, यात्रेनिमित्त प्रत्येकी पाच दिवसांचा बंदोबस्त होमगार्ड लोकांना दिला जातो. तसेच ईद, महापुरुषांच्या जयंत्यानिमित्तानेही त्यांना प्रत्येकी तीन दिवसांचा बंदोबस्त दिला जातो. होमगार्ड लोकांना प्रत्येक दिवशी किमान दहा तासांची ड्यूटी केल्यानंतर 670 रुपयांचे मानधन दिले जाते. राज्यात 45 हजार 727 होमगार्ड असून त्यांची बंदोबस्तासाठी मदत घेतली जाते. त्यासाठी दरवर्षी 176 कोटींची गरज लागते. मात्र, कोरोनामुळे 25 मार्चपासून होमगार्ड लोकांची मदत बंदोबस्तासाठी घेतली जात आहे. त्यामुळे वार्षिक बजेट दोशने कोटींनी वाढले, परंतु तेवढी रक्‍कम उपलब्ध नसल्याने होमगार्ड मानधनाविनाच काम करु लागले आहेत. 

  मानधन मागणीचा पाठविला प्रस्ताव
  नाव्हेंबर, डिसेंबर 2019, जानेवारी 2020 आणि त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्‍टोबरपर्यंत होमगार्डना मानधन मिळाले नाही. दिवाळीपूर्वी मानधन मिळावे, यादृष्टीने पोलिस महासंचालक कार्यालयाकडे निधीची मागणी केली आहे. 
  - बाबुराव घाडगे, प्रशासकीय अधिकारी, होमगार्ड, सोलापूर 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Corona has no duty to 12,000 homeguards over the age of 45