राज्यात पुन्हा उद्रेक.... एकाच दिवसात 11,147 रुग्णांची भर; वाचा इतर आकडेवारी

मिलिंद तांबे
Thursday, 30 July 2020

राज्यात आज कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसभरात 11,147 रुग्णांची विक्रमी नोंद झाली.

मुंबई : राज्यात आज कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसभरात 11,147 रुग्णांची विक्रमी नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 4,11,798 झाली आहे. असे असले तरी आज दिवसभरात 8860 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आज 266 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 14,729 वर पोहोचला आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,48,150 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ST च्या नव्या ट्विटर हॅंडलवर तक्रारींचा पाऊस, महामंडळाकडून मात्र सपशेल कानाडोळा...

आज 8860 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 2,48,615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.37 % एवढे झाले आहे.आज राज्यात एकूण 266 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी ठाणे परिमंडळ 96, पुणे मंडळ 103,नाशिक 26, औरंगाबाद मंडळ 7,कोल्हापूर 11, लातूर मंडळ 18,अकोला मंडळ 3 ,नागपूर 2 येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.58 % एवढा आहे.   

शहरात 'इतके' लाख नागरीक आजही आहेत प्रतिबंधीत क्षेत्रात, नागरिकांनो कोरोनाबाबत हलगर्जीपणा नकोच

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 20,70,128 नमुन्यांपैकी 4,11,798 ( 19.89 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,04,141 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 40,546 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona increse in the state .... 11,147 patients in a single day; Read other statistics