Exclusive ! शारीरिक संबंधातून अन्‌ स्तनपानातून होत नाही कोरोना; मात्र, तोंडाला लावावा मास्क, हात वारंवार स्वच्छ धुवावेत

तात्या लांडगे
Monday, 4 January 2021

अशी घ्यावी काळजी...

 • प्रसूत महिलांनी स्तनपान करताना तोंडाला लावावा मास्क, हात वारंवार स्वच्छ धुवावेत
 • बाळास स्तनपान करताना वारंवार त्याला हात लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी
 • शारीरिक संबंध ठेवताना मास्क, सॅनिटायझरचा वापर केल्यास होत नाही कोरोनाचा संसर्ग
 • तोंड, डोळा आणि नाकाचा थेट संपर्क समोरील व्यक्‍तीसोबत येणार नाही, याची घ्यावी काळजी
 • गर्दीतून कोरोनाचा संसर्ग, प्रादुर्भाव वाढण्यास वाव; गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे

सोलापूर : कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रादुर्भाव तोंड, नाक आणि डोळ्याच्या माध्यमातून वाढतो. मात्र, प्रसूतीनंतर कोरोना पॉझिटिव्ह महिलेने आपल्या बाळाला स्तनपान केल्यानंतर बाळाला कोरोना होत नाही. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तीने शारीरिक संबंध ठेवताना योग्य ती खबरदारी घेतल्यासही कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे निरीक्षण वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने नोंदविले आहे.

 

अशी घ्यावी काळजी...

 • प्रसूत महिलांनी स्तनपान करताना तोंडाला लावावा मास्क, हात वारंवार स्वच्छ धुवावेत
 • बाळास स्तनपान करताना वारंवार त्याला हात लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी
 • शारीरिक संबंध ठेवताना मास्क, सॅनिटायझरचा वापर केल्यास होत नाही कोरोनाचा संसर्ग
 • तोंड, डोळा आणि नाकाचा थेट संपर्क समोरील व्यक्‍तीसोबत येणार नाही, याची घ्यावी काळजी
 • गर्दीतून कोरोनाचा संसर्ग, प्रादुर्भाव वाढण्यास वाव; गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे

राज्यात दरमहा आठ लाखांहून अधिक महिलांची प्रसुती होते. कोरोना काळात प्रसूतीपूर्वी कोरोना टेस्ट करणे आवश्‍यक करण्याचा नियम करण्यात आला. कोरोना चाचणीत हजारो महिला प्रसूतीपूर्वीच कोरोना बाधित आढळल्या. प्रसूती झालेल्या महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना बाळास कोरोना होईल, याची भिती होती. मात्र, संबंधित महिलेने तोंडाला मास्क लावून आणि हात स्वच्छ धुवून बाळास स्तनपान केल्यास कोरोना होत नाही, हे समोर आल्याने त्यांना दिलासा मिळाला. ज्या महिलांनी काळजीपूर्वक स्तनपान केले नाही, त्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली. मात्र, बाळासह त्या महिलांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली. सोलापुरातील बॉईज हॉस्पिटलमध्ये दोन महिलांना कोरोना झाला असतानाच त्या प्रसूत झाल्या. त्यानंतर त्या मातेने डॉक्‍टरांच्या मदतीने बाळास काळजीपूर्वक स्तनपान केले. आता त्या महिला कोरोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या असून बाळ ठणठणीत असल्याचा अनुभव तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लता पाटील यांनी सांगितला.

मास्क, सॅनिटायझरचा वापर गरजेचा
शारीरिक संबंध आणि प्रसूती झालेल्या महिलांनी आपल्या मुलांना काळजीपूर्वक स्तनपान केल्यास कोरोनाचा संसर्ग होत नाही. कोरोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने तोंड, नाक आणि डोळ्यातून होतो. त्यामुळे मास्क, हाताची स्वच्छता हे महत्त्वाचे आहे. 
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Corona is not caused by sexual intercourse or breastfeeding