पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातांमध्ये वाढ; मृत्यूचा आलेखही चढाच

 Pune Mumbai Highway
Pune Mumbai Highway sakal media

मुंबई : कोरोना महामारीचे (corona pandemic) निर्बंध शिथिल झाल्यानंतर यावर्षी अपघात आणि मृत्यूच्या संख्येत (Accidents and death numbers) वाढ दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात 62 जीवघेण्या अपघातांमध्ये 66 मृत्यू (Accidents deaths) झाले आहे. त्यातुलनेत यावर्षी मात्र जीवघेण्या अपघातांमध्ये तब्बल 68 मृत्यूची नोंद झाली असून याच दहा महिन्यात यावर्षी एकूण 157 अपघातांमध्येही वाढ झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांमध्ये (Highway Police report) करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्यापुर्वी 2018 मध्ये वर्षभरात एकूण 358 अपघात झाले आहे. तर 96 जीवघेण्या अपघातांमध्ये 110 मृत्यू झाले आहे. मात्र, यातुलनेत 2019 ते 2020 या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध असल्याने अपघात आणि मृत्यूच्या घटनांमध्ये घट झाली होती.मात्र, त्यानंतर आता निर्बंध शिथिल होताच पुन्हा अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

2018 मध्ये वर्षभरात 358 एकूण अपघात झाले असून, त्याप्रमाणेच 2019 - 306, 2020 - 160 तर जानेवारी ते ऑक्टोबर 2020 मध्ये दहा महिन्यात 123 एकूण अपघात झाले असून, यावर्षी याच दहा महिन्यात 157 अपघात झाले आहे.

अपघातांची कारणे

ओव्हरस्पीड, लेन कटिंग, सिग्नल जम्पिंग, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, यासह मोटार वाहन कायद्यांतर्गत नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या अभ्यासातून पुढे आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com