esakal | Corona update : राज्यात रुग्णसंख्येचा वाढता आलेख कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates

Corona update : राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख कायम

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आलेख अद्यापही कायम आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात ६७,१२३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांच्या बरं होण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१८ टक्के झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या चोवीस तासात ६७,१२३ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५६,७८३ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दिवसभरात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाणं ८१.१८ टक्के झालं आहे. दरम्यान, राज्यात सध्या ६,४७,९३३ अॅक्टिव्ह रुग्ण असून आजवर ३०,६१,१७४ रुग्णांना रुग्णालयातून यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजवर ५९,९७० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत ८८३४ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत आज ८,८३४ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ५,७०,८३२ वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा ८७,३६९ हजारांवर पोहोचला आहे. आज दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १२, २९४ वर पोहोचला आहे.

पुण्यात १२,८३६ नव्या रुग्णांची नोंद

पुणे जिल्ह्यात आज पहिल्यांदाच १२, ८३६ इतके उच्चांकी नवे कोरोना रुग्ण आढळून आले. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ६,००६ जण आहेत. आज दिवसभरात १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील ५४ मृत्यू आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी किमान शंभर किंवा त्याहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक ४७ हजार २७६ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

loading image