esakal | Corona Update: राज्यात आज 568 जणांच्या मृत्यूची नोंद; 7 लाख सक्रिय रुग्ण

बोलून बातमी शोधा

corona
Corona Update: राज्यात आज 568 जणांच्या मृत्यूची नोंद; 7 लाख सक्रिय रुग्ण
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई- राज्यात मृत्यूचे  थैमान सुरूच असून आज 568 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर 1.53 % इतका आहे. राज्यात आज दिवसभरात 67 हजार 013 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 40,94,840 झाली आहे. आज नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 309 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 158 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 101 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54 % एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण 6,99,858 सक्रिय रुग्ण आहेत.

आज 62,298 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 33,30,747 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34 % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,48,95,986 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40,94,840 (16.45 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,71,917 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,014 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.