esakal | Corona Update: राज्यात रुग्णांच्या संख्येत आज घट; 351 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Update: राज्यात रुग्णांच्या संख्येत घट; 351 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई- राज्यात गेल्या 24 तासांत 58,924 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत, तर 52 हजार 412 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 351 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 लाख 98 हजार 262 झाली आहे. आतापर्यंत राज्यात 60,824 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील रुग्णांची संख्या चढी राहिली आहे. रविवारी राज्यात 68 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळले होते. कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या घटली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. रविवारी राज्यात जवळपास 68 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लादण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण, त्याचा योग्य तो परिणाम दिसून येत नसल्याचं दिसत आहे. शिवाय कठोर निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत आहेत. अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. सध्या किराणा मालाची दुकानं सकाळी 8 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येत होती. या दुकानांवर लोकांची मोठी गर्दी होत होती. यापार्श्वभूमीवर किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच म्हणजे 5 तासांच सुरु ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे आढळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञांच मत आहे. त्यामुळे देशातील सर्वांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी अशी मागणी होत होती. यावर केंद्र सरकारने 18 वर्ष वयांपुढील सर्व व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 45 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत होती. 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळेल. कोरोनावर मात करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय.

loading image
go to top