हवेत तीन तास राहतात कोरोनाचे विषाणू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

हा धोका टाळण्यासाठी सार्वजनिक,गर्दीची ठिकाणे,सार्वजनिक शौचालये,प्रसाधनगृह यांचा वापर करताना पुरेशी काळजी घ्यावी.तसेच, घर आणि आपले कार्यालय वेळोवेळी सॅनिटाईज करावे,असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

मुंबई - हवेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होतो, हे यापूर्वी समोर आले आहे. मात्र, हवेत हे विषाणू साधारणत: अडीच ते तीन तास राहतात, अशी नवी माहिती आता समोर येत आहे. एवढेच नव्हे तर हे विषाणू हवेत २५ ते ३० फुटांपर्यंत वर जात असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर फिरणे टाळावे आणि सुरक्षा साधनांचा आवर्जून वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या साथीला आठ महिन्यांचा काळ लोटला आहे. या आठ महिन्यांत विषाणूंमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यानुसार त्याची वेगवेगळी निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. एखादा बाधित खोकल्यास अथवा शिंकल्यास त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबांमधून हे विषाणू हवेत पसरतात. त्यानंतर ते अडीच ते तीन तास त्या परिसरात राहतात. या दरम्यान एखादा निरोगी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्यास त्याला विषाणूंची बाधा होण्याचा धोका असतो, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा धोका टाळण्यासाठी सार्वजनिक, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक शौचालये, प्रसाधनगृह यांचा वापर करताना पुरेशी काळजी घ्यावी. तसेच, घर आणि आपले कार्यालय वेळोवेळी सॅनिटाईज करावे, असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus stays in the air for three hours

Tags
टॉपिकस
Topic Tags: