आता एवढंच राहिलं होतं: श्राद्धासाठी कावळे घेताहेत मीटिंग; कावळ्यांकडून श्राद्धासाठीचे नियम जाहीर

सुस्मिता वडतिले 
Friday, 4 September 2020

बुधवार (२ सप्टेंबर पासून) पितृपक्ष पंधरवडा म्हणजेच महालयारंभ सुरु झाला आहे. या १५ दिवसांमध्ये कावळा हा मानाचा राजा असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचे म्हणजेच कावळ्यांचे काही संभाषण व्हायरल होत आहेत. 

पुणे : जगभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातलेले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काही नियम आणि उपायोजना करत आहे. त्याचपद्धतीने कावळ्यांनीसुद्धा यावर्षी श्राद्ध अधिवेशन २०२० ची नियमावली तयार केली आहे. सध्या हेच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. 

भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. बुधवार (२ सप्टेंबर पासून) पितृपक्ष पंधरवडा म्हणजेच महालयारंभ सुरु झाला आहे. म्हणजेच या पंधरा दिवसात घरातील पुर्वज्यांच्या नावाने जेवू घातले जाते. त्याच निमित्ताने या दिवसात कावळ्याला खूप मान असतो. या १५ दिवसांमध्ये कावळा हा मानाचा राजा असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचे म्हणजेच कावळ्यांचे काही संभाषण व्हायरल होत आहेत. 

देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन केले आहे. सरकारने सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली आहे. तरीही कोरोनाने सर्वत्र घेरले आहे. त्यामुळे या दिवसात आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी सरकार सांगत आहे. त्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर, मास्कचा वापर केला जात आहे. सोशल डिस्टंन्स पाळला जात आहे, रेड झोन भागात नो एन्ट्री केली आहे. अशा अनेक गोष्टीं पाळल्या जात आहेत. 

त्याचपद्धतीने पितृपक्ष पंधरवडा या दिवसांमध्ये सोशल मीडियावर कावळ्यांचे कोरोनापासून बचाव करण्यासाठी संभाषण व्हायरल होत आहेत. म्हणजे कावळ्यांनीसुद्धा वाढत्या कोरोनामुळे श्राद्ध मिटिंग घेऊन स्वतःची काळजी घेण्याबद्दल एकमेकांना सांगत असलेले वाक्य व्हायरल होत आहेत. अनेक दिवसांपासून कोरोनामुळे सरकार नवनवीन नियम आणि आदेश काढत आहेत. त्यातच यावेळी श्राद्ध अधिवेशन २०२० ची नियमावलीही चर्चेत आहे. तसेच कावळ्यांचे काही संभाषण ही चर्चेत आहेत. 

कावळा आणि आई... 

कावळा       -     मी श्राद्ध खायला जात आहे 
त्याची आई  -     चोचेला स्यानिटायझर लावून जा आणि रेड झोन मध्ये जाऊ नको नाहीतर क्वारंटाईन व्हवं लागेल... 

 श्राद्ध मिटिंग... 

- श्राद्धाला जाताना आणि येताना आपल्या चोचीला सॅनिटायझर करणे 
- लहान आणि वयोवृद्ध कावळ्यांनी श्राद्धाला जाऊ नये 
- रेडझोन भागात जो कावळा श्राद्धाला जाईन त्याला १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येईल 
- शहरात गर्दीच्या ठिकाणी श्राद्धाला जाऊ नये, त्यापेक्षा खेडेगावात श्राद्धाला जावे 
- एका ठिकाणी २० पेक्षा जास्त कावळ्यांनी श्राद्धाला जाऊ नये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Coronas day the crow is also holding a meeting