महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण; पुण्यातीलच तीन जण वाढले!

टीम ई-सकाळ
बुधवार, 11 मार्च 2020

मुंबईतील दोन सहप्रवासीदेखील कोरोनाबाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे.

पुणे : पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णाचे सहप्रवासी असलेले मुंबईतील दोन जणांचे नमुने बुधवारी "पॉझिटिव्ह' आले. दुबईच्या सहलीचा परतीचा प्रवास करताना पुण्यातील रुग्णांच्या सान्निध्यात हे दोन रुग्ण आले होते. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दहा झाल्याची माहिती आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुबई येथून प्रवास करून आलेले पुण्यातील दोन प्रवासी यापूर्वी कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रुग्णांसोबतचे मुंबईतील दोन सहप्रवासीदेखील कोरोनाबाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. दरम्यान, दुबईहून आलेल्या दाम्पत्याचे आणखी तीन सहप्रवासी पिंपरी येथील आहेत. त्या तिघांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता आहे.

पुण्यातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

विदेशात कोण कोण जाऊन आले?
मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारपर्यंत एक हजार 195 विमानांमधील एक लाख 38 हजार 968 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार, सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या तीन विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांकडून आवश्‍यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय, बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशातून जाऊन आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्यात आत्तापर्यंत बाधित भागातून एकूण 635 प्रवासी आले आहेत. 

पुण्यातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

32 जणांचे नमुने निगेटिव्ह
ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने प्रवाशांना राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 349 जणांना भरती करण्यात आले आहे. भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व 312 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले असून, सात रुग्ण "पॉझिटिव्ह' आहेत. आजवर भरती झालेल्या 349 प्रवाशांपैकी 312 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 18 जण पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात आणि 15 जण मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती आहेत. याशिवाय, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड येथील "वायसीएम' रुग्णालय येथेही संशयित रुग्णांना दाखल केले आहे. 

पुण्यातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

ज्यभरात विलगीकरण कक्ष 
नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून, राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 खाट उपलब्ध आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus affected people toll rise 10 maharashtra three more from pune