राज्यातील सीमा तपासणी नाके भ्रष्टाचाराचा अड्डा; काँग्रेसचा आरोप | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corruption

राज्यातील सीमा तपासणी नाके भ्रष्टाचाराचा अड्डा; काँग्रेसचा आरोप

मुंबई : राज्याच्या सीमेवरील परिवहन विभागाचे सीमा तपासणी नाके अवैध असून, जीएसटीच्या (GST) वन नेशन वन मार्केट या तत्त्वाच्या विरोधात आहे. तपासणी नाक्याच्या नावावर राज्यात भ्रष्टाचार (corruption) सुरु आहे. जीएसटी आणि ऑनलाईन वाहन, सारथीच्या आगमनानंतर राज्य चेकपोस्ट अनावश्यक बनल्या आहे. त्यामुळे राज्यातील सीमेवरील परिवहन विभागाच्या (RTO) सीमा तपासणी नाके बंद करण्याची मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बाल मलकीत सिंह (Bal Malkit singh) यांनी मागणी केली आहे.

हेही वाचा: भाईंदर: अनैतिक प्रेमसंबंधांच्या संशयातून प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार

सीमा तपासणी नाके बंद केल्यास ट्रक चालकांचे आर्थिक शोषण थांबणार आहे. तर मालवाहतुकीचे अडथळे सुद्धा दूर होऊन वाहतुकदारांचा वेळ वाचणार आहे. वाहन, सारथी मुळे वाहतुकदारांची संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध असतांना परिवहन विभागाचे सीमा तपासणी नाक्यांची गरज नाही. त्यानंतरही ऑफलाईन पद्धतीने वाहनांची तपासणी केली जात आहे.

गेल्यावर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र , मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, केरळ , तेलंगणा , आंध्रप्रदेश, पोंदेचेरी, गोवा, उत्तराखंड, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यातील प्रधान सचिवांना केंद्र सरकारने सीमा तपासणी नाके बंद करण्याचे पत्र पाठवले आहे. हे पत्र आता पुन्हा समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने वाहतूकदार संघटना सीमा तपासणी नाके बंद करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Corruption Is Going On At Border Check Post Of Rto Maharashtra Allegation By Congress Bal Malkit Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top