Santosh Deshmukh Murder Case : आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
Court Order: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे यांची संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयीन आदेश देण्यात आला असून, पोलिसांनी मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.