
माजलगाव: चिखल बीड (ता. वडवणी) येथील शेतकऱ्यांची जमीन तलावात गेलेल्या जमिनीचा संपूर्ण मावेजा १० वर्षानंतरही दिला नाही. यामुळे माजलगाव न्यायालयाच्या आदेशाने थेट जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करून न्यायालयात जमा केल्याने खळबळ उडाली आहे.