
यवतमाळ : गोरगरिबांना मोफत सेवा देण्याच्या नावाखाली काही टोलेजंग रुग्णालयांनी ‘धर्मादाय रुग्णालया’चा दर्जा मिळविला. मात्र तेथे पैसे घेतल्याशिवाय सेवाच मिळत नसल्याचा प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे चव्हाट्यावर आला. त्यामुळे आता राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावर थेट नजर ठेवण्यासाठी १८६ आरोग्य सेवकांची नेमणूक केली जाणार आहे.