Crime News: धक्कादायक! इंस्टाग्राम मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार

इन्स्टाग्रामवर ‘समिना क्वीन’ नावाने खाते उघडून साधली जवळीक
latur Crime News
latur Crime Newsesakal

लातूर: इन्स्टाग्रामवर ‘समिना क्वीन’ नावाने खाते उघडून जवळीक साधत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले. या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

फिरोज सय्यद (वय १९, रा. जानवळ, ता. चाकूर) हा या घटनेतील मुख्य संशयित आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ‘समिना क्वीन’ नावाने खाते उघडले आहे. शहरातील एका अल्पवयीन मुलीला त्याने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली. यातून दोघांत काही दिवस चॅटिंग सुरू झाले.

latur Crime News
Vidhan Parishad: Eknath Khadse यांनी Abdul Sattar, Eknath Shinde यांच्यावर पक्षांतरावरून साधला निशाणा

इन्स्टाग्रामवरची समोरची व्यक्ती ही एक मुलगीच आहे, असे समजून ही अल्पवयीन मुलगी प्रतिसाद देत राहिली. एके दिवशी या अल्पवयीन मुलीला औसा मार्गावर भेटण्यासाठी बोलावले. समोर आल्यानंतर समोरची व्यक्ती ही मुलगी नसून मुलगा असल्याचे तिच्या लक्षात आले.

एकामेकांशी बोलत असताना फिरोज सय्यद याने या मुलीला जवळ घेऊन फोटो काढले. ‘मला एक गर्लफ्रेंड आणून दे, नाही तर तू तर माझी गर्लफ्रेन्ड हो, अन्यथा हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवतो’ असे म्हणून फिरोज तिला धमक्या देऊ लागला.

यातून फिरोजने तिला शहराच्या बाहेर नेऊन बलात्कार केला. मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिरोज सय्यद याच्यासह त्याला साथ देणारे तिघे असे चौघांच्या विरोधात बलात्कार, पोक्सो, आयटी ॲक्ट आदी कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

latur Crime News
11th Admission: CBSE, ICSE विद्यार्थ्यांसाठी १० ते १५ टक्के जागा रिक्त ठेऊन ११वी प्रवेश प्रक्रिया राबवावी; शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना

अल्पवयीन मुलाचाही समावेश

पोलिसांनी तपास करून फिरोज सय्यद याच्यासह त्याला साथ देणारे सोहेल मन्नान करपुडे (वय २०, रा. जानवळ), साबेर अखिल शेख (१९, रा. औसा) या संशयितांना अटक केली. त्यांना आज न्यायालयासमोर उभे करण्यात आले.

न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com