
Crime News : शिक्षकाने विद्यार्थीनीला कॉपीगर्ल म्हटलं; तिने केलं असं काही की...
लातूर - शालेय जीवनात मुलामुलींचं मानसिक आरोग्य जपणं अत्यंत गरजेचं झालं आहे. लातूरमधील एका शाळेत घडलेल्या घटनेमुळे ही पुन्हा अधोऱेखित झालं आहे. येथील शाळेत विद्यार्थीनीला कॉपी गर्ल म्हटल्याने दुखावलेल्या मुलीने धक्कादायक पाऊल उचललं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बासला आहे.
हेही वाचा: Amruta Dhongade: चांगभलं! अमृता धोंगडे कोल्हापुरात ज्योतिबाच्या दर्शनाला..
शिक्षिकेने आपल्याला कॉपी गर्ल म्हटलं म्हणून नववीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. किड्स इन्फो पार्क शाळेत मुलगी शिकत होती. सीबीएसईच्या दुसऱ्या सत्राच्या परिक्षेत शिक्षकाने तिला कॉपी करताना पकडलं होतं. यावेळी शिक्षकाने तिला सर्व विद्यार्थ्यांसमोर कॉपी गर्ल म्हटलं होतं.
दरम्यान शिक्षकाने कॉपी गर्ल म्हटलं म्हणून तिला अत्यंत वाईट वाटलं. आपला अपमान केल्याची भावना तिला सहन झाली नाही. त्यानंतर तिने सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.