राज्यात कोरोनाकाळात वाढलं गुन्ह्यांचं प्रमाण; जाणून घ्या आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

राज्य सरकारने वारंवार आवाहन करुनही बरीच लोकं विनाकारण बाहेर पडत होती. लॉकडाउन काळात  96 हजार 106 वाहने जप्त केली होती. तसेच 1347 अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे दाखल झाले आहेत.

पुणे - महाराष्ट्रात 22 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत लॉकडाउन होतं. लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत पोलिसांनी नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवले आहेत. याकाळात कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 46 हजार 179 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच लॉकडाउनमध्ये 34 हजार 182 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 23 कोटी 47 लाख 53 हजार 164 रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउन काळात राज्यातील सर्व व्यवहार बंद होते. याकाळात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्यास मुभा होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी 8 लाख 17 हजार 448 पास पोलिसांमार्फत देण्यात आले होते. लॉकडाउन दरम्यान 343 वेळा पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या असून 892 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच यादरम्यान 1 लाख 11 हजार 398 वेळा पोलिसांची हेल्पलाईन असणाऱया 100 नंबरवर फोन आले होते. तसेच राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा 829 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने वारंवार आवाहन करुनही बरीच लोकं विनाकारण बाहेर पडत होती. लॉकडाउन काळात  96 हजार 106 वाहने जप्त केली होती. तसेच 1347 अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या राज्यात 385 पोलिस अधिकारी आणि 2429 पोलीस कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crime rate in the state increased during the Corona