Crime: फिरोजपूर तिहेरी हत्याकांडातील सहा शार्प शूटर जेरबंद!

समृद्धी महामार्गावरील बोगद्यात संभाजीनगर पोलिसांची ‘फिल्मी स्टाइल’ कारवाई
Crime: फिरोजपूर तिहेरी हत्याकांडातील सहा शार्प शूटर जेरबंद!
Updated on

Latest SambhajiNagar News: देशाला हादरा देणाऱ्या पंजाबमधील फिरोजपूर इथल्या तिहेरी हत्याकांडातील सात आरोपींना अटक करण्यात आली. तीन सप्टेंबरला आरोपींनी फिरोजपूर येथे महिलेसह तिच्या दोन भावांवर बेछूट गोळीबार करत हत्या केली होती. शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावर सावंगी जवळील बोगद्यात सापळा रचून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलाच्या सुमारे ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जेक धाडसी कारवाई केली.

अक्षयकुमार ऊर्फ बच्छा बलबीरसिंग (वय २१), गुरुप्रीत दर्शनसिंग गोपी (वय २५), दिलेरसिंग मनिंदर चिवनसिंग (वय २२), प्रिन्स काका संधू (वय १८), सुखचैनसिंग गब्बरसिंग जास (वय २०), रवींदरसिंग करनेलसिंग सुख (वय २१ सर्व रा. पंजाब) अशी आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com