मुंबई - जुन्या पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाला म्हणून, राज्य सरकारने केंद्र शासनाची नवीन पीक विमा योजना स्वीकारली. मात्र जुन्या योजनेतील पाच निकषांपैकी केवळ पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला आहे..जुन्या योजनेतील वेगवगेळे निकष शेतकऱ्याला विविध टप्प्यांवर मदत करणारे होते, मात्र ते निकष नसल्याने शेतकऱ्याला फारसा फायदा होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विमा योजनेचे निकष बदलण्याची मागणी केली जात आहे.महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक, गुरे, घरे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीत आले आहेत..अशा परिस्थितीत पीक विमा योजनेत झालेले बदल शेतकऱ्यांसाठी नवीन आव्हाने घेऊन आले आहेत. पीक विमा योजनेतील बदलामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींची भरपाई मिळणे कठीण झाले आहे. जुन्या योजनेत मिळणारे संरक्षण आता नवीन योजनेत उपलब्ध नाही..शेतकऱ्यांना फारसा फायदा नाही; निकष बदलण्याची मागणीजुने निकषनुकसान भरपाईचे पाच घटकप्रतिकूल हवामानामुळे उगवण न होणेहंगामातील प्रतिकूल परिस्थितीने झालेले नुकसानपीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घटस्थानिक नैसर्गिक आपत्तीकाढणी पश्चात नुकसानमर्यादा : ३० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई मिळत होतीफायदे : अतिवृष्टी, स्थानिक आपत्तींसाठी देखील भरपाई मिळू शकत होती .नवीन नियमांमुळे होणारा परिणामअतिवृष्टीमुळे पीक पूर्णपणे नष्ट झाले तरी, नवीन नियमानुसार ‘उत्पादन आधारित’ नुकसानीची ५० टक्के मर्यादा लागू होईल. संपूर्ण पीक वाया गेले असले, तरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरपाई मिळणे कठीण होईल..कापणीअंतीच पैसे मिळणारनवीन नियमांनुसार, कापणीअंतीच पीक विम्याचे पैसे मिळतील. अतिवृष्टीमुळे पीक काढणीपूर्वीच नष्ट झाल्यास शेतकऱ्याला रोख रकमेची गरज असतानाही तत्काळ मदत मिळणार नाही..अतिवृष्टीग्रस्तांना मिळालेली मदतवर्ष - रक्कम (कोटींत)२०२४-२५ - ३,१५९२०२३-२४ - २,१२२२०२१-२२ - २,३०९२०२१-२२ - २,३८७.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.