ही गर्दी भविष्याची दिशा ठरविणार : पंकजा मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा स्वाभीमान टिकवून ठेवणार आहे. गोपीनाथ मुंडेंनी जे काम केले ते पुढे न्यायचे आहे. सावरगाव हे आमच्यासाठी चेतनाभूमी बनली आहे. ही गर्दी भविष्याची दिशा ठरविणार असल्याचे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सावरगाव : तुमच्या दारात सेवा करता यावी यासाठी कार्य करत राहणार. मी आयुष्यभर तुमची सेवा करत राहील. शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा स्वाभीमान टिकवून ठेवणार आहे. गोपीनाथ मुंडेंनी जे काम केले ते पुढे न्यायचे आहे. सावरगाव हे आमच्यासाठी चेतनाभूमी बनली आहे. ही गर्दी भविष्याची दिशा ठरविणार असल्याचे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (मंगळवारी) दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव येथील भगवान भक्‍तीगडावर उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शहा यांना निमंत्रण दिले होते. भगवान भक्‍तीगड, सावरगाव, ता. पाटोदा, जिल्हा बीड येथे असून,यावेळी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, की अमित शहा आज भगवानबाबांच्या जन्मभूमीत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात आणखी मोठे सिमोल्लंघन होतील. अमित शहांनी कलम 370 हटवून न्याय दिला. देशभक्तीने आज सर्वांनी एकत्र आणले आहे. तुमच्यासाठी आम्ही आज 370 तोफांची सलामी दिली. आज मेळाव्याला झालेली गर्दी भविष्याची दिशा बदलणार आहे. भगवानबाबांनी सर्वांना शिक्षणाचा विचार दिला. पुढच्या पाच वर्षांत आमच्या उसतोड कामगारांना कोयता उचलण्याची गरज पडणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This crowd will decide the direction of the future says pankaja munde