
छत्रपती संभाजीनगर: बारावीचा निकाल लागताच विद्यार्थी निवडक अभ्यासक्रमासाठी जास्त गर्दी करतात. यावर्षी तंत्रशिक्षण विभाग आणि महाविद्यालयाच्यावतीने प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले असून वेळापत्रकदेखील निश्चित करण्यात आले आहे. यंदा डी-फार्मसीला विभागातील १११ महाविद्यालयातून एकूण ६ हजार ७२० जागा भरल्या जाणार आहेत.
बारावी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) विद्या शाखेत करिअरचे विविध पर्याय, संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअरच्या माध्यमातून आरोग्य सेवा करण्याची संधी मिळते.
बारावी सायन्सनंतर विद्यार्थ्यामध्ये फार्मसी विद्याशाखेत पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येते. शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित कॉलेजमध्ये संबंधित अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचे मेडिकल शॉप, फार्मासिस्ट, ड्रग्ज इन्स्पेक्टर, मार्केटिंग, रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट या क्षेत्रात काम करता येते.
त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरसाठी फार्मसी क्षेत्र रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त आहे. यंदा डी-फार्मसाठी विभागातील एकूण १११ महाविद्यालयात एकूण ६ हजार ७२० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील २९ महाविद्यालयात तब्बल १ हजार ८०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
बीड जिल्ह्यातील एकूण १४ महाविद्यालयात ८४० विद्यार्थ्यांना डी- फार्मसीला प्रवेश दिले जाणार आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील ४ महाविद्यालयात २४० विद्यार्थ्यांना डी- फार्मसीला प्रवेश दिले जाणार आहे.
तसेच जालना जिल्ह्यातील १० महाविद्यालयात ६०० जागा भरल्या जाणार आहेत. याशिवाय लातूर जिल्ह्यातील एकूण १८ महाविद्यालयात १ हजार ८० विद्यार्थ्यांना प्रवेश डी- फार्मसीला दिले जाणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील १५ महाविद्यालयात ९०० विद्यार्थ्यांना प्रवेश डी- फार्मसीला दिले जाणार आहेत.
तर उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ९ महाविद्यालयात ५४० जागांवर डी- फार्मसीला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील १२ महाविद्यालयात ७२० जागा यंदा डी- फार्मसीला भरण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.