पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, बीड जिल्ह्यांतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ऐन पिके काढणीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.

पुणे - राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता.२०) सर्वदूर जोरदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला. शेतांमध्ये पाणी साचून काढणीला आलेली पिके पाण्याखाली जात आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, बीड जिल्ह्यांतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ऐन पिके काढणीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळे, नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठवाड्यात सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आधी मूग आता उडीद सोयाबीन व कपाशी आदी पिके संकटात सापडली असून कुठे कपाशीची बोंड काळी पडली तर कुठे उडीद, सोयाबीनला मोड आले. अनेक शेतशिवारात पाणी साचले. जालना जिल्ह्यातील ६ औरंगाबाद व बीड मधील प्रत्येकी एक मिळून ८ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील राजणी ते विरेगाव मार्गावर दुधना नदीला आलेला पूर आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोकणात मुसळधार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस होता. निसवण्याच्या स्थितीत असलेले भात पीक धोक्यात येणार आहे. वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडीत धुव्वाधार पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रात दाणादाण
पुणे जिल्ह्यात अनेक भागांत बाजरीची काढणी अंतिम टप्प्यात होती. जवळपास ७५ टक्के बाजरी पिकाची काढणी झाली आहे, परंतु उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात हिळीनजिक पाण्याने बंधारे भरून वाहत आहे. 

विदर्भात कमी, अधिक जोर
विदर्भातील अनेक भागात कमीअधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोला, अमरावती जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.

पावसाचा तडाखा
राज्यात सर्वदूर पावसाचा जोर
कोकणात भात काढणी प्रभावित
सोलापूर जिल्ह्यात ऊस पिकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी टोमॅटो पीक जमीनदोस्त
मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, तूर,  मका, कापूस, हळदीला मोठा फटका
खानदेशात केळी, ऊस, मका पीक प्रभावित
नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

या पिकांना बसला फटका    
सोयाबीन 
कापूस 
ऊस 
तूर 
मका 
केळी
हळद 
कांदा 
द्राक्ष 
भात 
सुपारी 
ज्वारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to kharif crops due to heavy rains in Maharashtra