Dasara Melava: पक्षचिन्हाचा घोळ सुटणार? शिंदेंच्या मेळाव्यात होणार ५१ फूट तलवारीचं पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Melava cm eknath shinde 51 feet long sword shatra poojan at bkc ground

Dasara Melava: पक्षचिन्हाचा घोळ सुटणार? शिंदेंच्या मेळाव्यात होणार ५१ फूट तलवारीचं पूजन

मुंबई : उद्याच्या दसरा मेळव्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. उद्याच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून ५१ फूट लांबीच्या तलवारीचे पूजन करून शस्त्रपूजन केले जाणार आहे.

बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून यासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजच्या समोर ही पंचंड मोठी तलावर ठेवण्यात आली आहे. या तलवारीच्या पूजनाने शिंदेच्या दसरा मेळाव्याची सुरूवात होणार आहे. ही ५१ फूटांची तलवार पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली आहे. या शिवाय एक १२ फूटाची तलवार देखील व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यात शिंदे कोणावर तोफ डागणार यासोबतच या भव्य तलवारीची देखील चर्चा होत आहे.

हेही वाचा: Maharashtra: दिवाळी पॅकेज, पोलिसांना गृहकर्ज, सिंचनासाठी निधी; वाचा मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

सध्या शिवसेना-शिंदे गटात पक्षचिन्हावरून वाद सुरू आहे, यानंतर आता शिंदे गटाच्या मेळाव्यात होत असलेल्या या तलवारीच्या पूजनामुळे शिंदे गटाकडून नव्या पक्षचिन्हासाठी चाचपणी केली जात आहे काय याबद्दल चर्चा सुरू आहे.

या दरम्यान बीकेसी मैदानावर कार्यकर्त्यांना कार्यक्रमाचा व्यवस्थित आनंद घेता यावा याकरिता तब्बल १०० एलएडी स्क्रीन देखील लावण्यात येणार आहेत. या दसरा मेळाव्यासाठी उद्या राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी उद्घाटनाआधीच समृद्ध महामार्ग खुला!