Dasara Melava : मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही; शिंदे गटाने पुन्हा ठाकरेंना डिवचलं

Dasara Melava i will not allow my shiv sena to be congress cm shinde criticized uddhav thackeray
Dasara Melava i will not allow my shiv sena to be congress cm shinde criticized uddhav thackeray esakal
Updated on

मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही या वाक्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. शिंदे गट आणि शिवसेना हे दोन्ही गट दसऱ्याची जय्यत तयारी करत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, शिंदे गट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (Dasara Melava i will not allow my shiv sena to be congress cm shinde criticized uddhav thackeray )

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. शिंदे गटाचा मेळावा बांद्रा कुर्ला संकुलातील विशाल मैदानावर संपन्न होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा परंपेरची सुरुवात केली. गेली अनेक दशके देशाला पोखरुन काढणारी स्वार्थी प्रवृत्ती उपटून काढण्याची खरी सुरुवात या मेळाव्यातून झाली, असं सांगत बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांची परंपरा मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांचा मेळावा बीकेसीमध्ये संपन्न होतोय, असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात बांद्रा कुर्ला संकुलातील विशाल मैदानावरील शिंदे गटाच्या व्यासपीठाची चर्चा रंगली आहे. व्यास पीठावर मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही हे बाळासाहेबांचे विधान लिहण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यात ते म्हणतात, ते राष्ट्रवादीसोबत कधीही सरकार स्थापन करणार नाहीत. बाळासाहेब व्हिडीओत म्हणतात, ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची सरकार पाडली. त्यांच्यासोबत सरकार स्थापन्याचा विचारही करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणतात, सोनिया गांधींसमोर नमत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मी आहे म्हणून शिवसेना आहे. मी नसतो तर शिवसेना काँग्रेससारखी झाली असती. असे म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com