Video: मुख्यमंत्र्यांचं भाषण लांबलं अन् लोकांनी सोडलं सभास्थळ; वाचा प्रतिक्रिया
मुंबई : आज मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट तसेच भाजपवर चौफेर टीका केली , तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान बीकेसी मैदानवर शिंदेंच भाषण लांबलं आणि लोक भाषण अर्ध्यावर सोडून निघून जाताना दिसून आले.
मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्याकरिता महाराष्ट्रभरातून लोक बीकेसी मैदानावर पोहचले होते, मात्र मुख्यमंत्र्यांचे भाषण लांबल्याने नागरिक घराकडे परतताना दिसून आले. त्यामुळे राज्याच्या काना कोपऱ्यातून आलेले शिंदे समर्थक मुख्यमंत्र्यांचे भाषण संपण्याआधीच परत फिरल्याचे पाहायला मिळाले. नाशिक जिल्हा मालेगावहून आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, पण आता वेळ झाला आणि आणि भाषण थोडं उशीर सुरू झालं असल्यानं थोडं लांबलं त्यामुळं आम्ही निघालो असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा: Dasara Melava: 'अजित पवारांनी कधी माईक हिसकावून घेतला नाही'; ठाकरेंचा CM शिंदेंवर निशाणा
धाराशीवहून आलेल्या आजोबांनी सांगितलं की, सभा एकदम ओके झाल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वचके काढले, सर्वात गुलाबराव पाटील यांचं भाषण एक नंबर झालं, तर धैऱ्यशील माने ओके बोलल्याची प्रतिक्रिया दिली. मी म्हातारा माणूस असून गर्दीची अडचण असल्याने निघालो असल्याचे त्यांनी सांगितेलं. दुसऱ्या एका कार्यकर्त्याने काल रात्री रात्री नऊ वाजता निघालो होतो आणि आज सकाळी मुंबईत पोहचल्याचं सांगितलं, पण गाडीची पार्किंग दूर आहे आणि घरी पोहचण्यासाठी गाडीची अडचण असल्याने लवकर निघालो असल्याचे सांगितले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेत जेवनाची सोय व्यवस्थित झाल्याचे देखील यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
हेही वाचा: Eknath Shinde Vs Uddhav: दसऱ्यात कुणी मारली बाजी? काय आहे तुमचं उत्तर
एकंदरीत राज्यातील अनेक दूरच्या ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनी वाहनाच्या अडचणींमुळे आणि प्रवास दूरचा असल्याने लोकांनी लवकरच सभेतून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.