Eknath Shinde: शिंदे सेनेच्या मेळाव्याच्या टीझरमध्ये नेमका ‘तो’ शब्द राहिला; शिवसेनेने साधली संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde: शिंदे सेनेच्या मेळाव्याच्या टीझरमध्ये नेमका ‘तो’ शब्द राहिला; शिवसेनेने साधली संधी

Eknath Shinde: शिंदे सेनेच्या मेळाव्याच्या टीझरमध्ये नेमका ‘तो’ शब्द राहिला; शिवसेनेने साधली संधी

दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून काल प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरवर शिवसेनेनं जोरदार निशाणा साधला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता शिवसेना व एकनाथ शिंदे गटानं आपापल्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे गटानं दसरा मेळाव्याचा व्हिडिओ टीझरही शेअर केला आहे. त्यातून त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर दावा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे सेनेच्या मेळाव्याच्या टीझरमधील एक चुक पकडत एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.(Dasara Melava Shiv Sena leader Sushma Andhare reaction on video teaser released by Eknath Shinde )

एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून काल मेळाव्याचा व्हिडिओ टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यात बाळासाहेबांचं हिंदुत्व जपण्याची ग्वाही देण्यात आली आहे. एक नेता, एक पक्ष, एक विचार… हे शिवसेनेचं घोषवाक्य त्यात समाविष्ट करतानाच 'एक लव्य आणि एक नाथ' या शब्दांची जोडही देण्यात आली आहे. आनंद दिघे यांचा फोटोही व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे.

दरम्यान, या लॉन्च केलेल्या टीझरवरुन शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या टीझरवर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘विद्यमान मुख्यमंत्री नवे नवे दिघे भक्त झालेत, असा टोला त्यांनी हाणला आहे.