शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका! दसरा मेळाव्यासंदर्भातील याचिका फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Melava shivaji park Eknath Shinde Camp  application is rejected by high court

शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका! दसरा मेळाव्यासंदर्भातील याचिका फेटाळली

मुंबई : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याबाबत सुरु असलेल्या वादासंदर्भात आज कोर्टात सुनावणी संपली. दरम्यान शिवाजी पार्कसाठी शिंदे गटानेही हायकोर्टाचे दार ठोठावले होते मात्र तिन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर शिंदे गटाती याचिका उच्च न्यायलयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर शिंदे गटाला दसरा मेळावा घेता येणार नाहीये.

याचिकेत काय म्हटलं आहे?

शिंदे गटातर्फे शिवाजी पार्कसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपला शिंदे गट हीच आपली शिवसेना आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांकडे अशा प्रकारची परवानगी मागण्याचा कोणता अधिकार नाही. दरवर्षी शिवसेनेकडून सदा सरवणकर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मागत असतात. त्यामुळे त्यांचा अर्ज हा याचिकाकर्त्यांच्या आधी महानगरपालिकेकडे गेला आहे.

शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, देसाई यांच्याकडे शिवसेनेचे कोणतेही पद नाही. त्यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेसाठी परवानगी मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आपला शिंदे गट आहे हीच खरी शिवसेना. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी परवानगी शिंदे गटाला दिली पाहिजे असे शिंदे गटाच्या याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा: Milind Narvekar: कोण आहेत मिलिंद नार्वेकरांची जागा घेणारे रवी म्हात्रे?

शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगीसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. असे म्हणत मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते.

हेही वाचा: अखेर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी? मुख्यमंत्री शिंदे काय घेणार निर्णय

Web Title: Dasara Melava Shivaji Park Eknath Shinde Camp Application Is Rejected By High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CM Eknath Shinde