कर्जमाफीची तारीख ठरली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पंढरपुरात ५ शेतकऱ्यांना मिळणार ‘कर्जमुक्ती’; पहिल्यांदा २ लाखांपेक्षा कमी थकबाकीदार शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे

राज्य सरकारने थकबाकीतील शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी दिली आहे. यातून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ४० हजार कोटी रुपयांची माफी व प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. दरम्यान, आषाढी वारीच्या सोहळ्याचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना (२ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
MAHARASHTRA

MAHARASHTRA

Sakal solapur

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने थकबाकीतील शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी दिली आहे. यातून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ४० हजार कोटी रुपयांची माफी व प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. दरम्यान, आषाढी वारीच्या सोहळ्याचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना (२ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दरवर्षी आषाढी वारीसाठी राज्यभरातून २५ ते ३० लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. त्यात बहुतेक शेतकरीच असतात. यंदाही ३० लाखांवर भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी वारीचे संपूर्ण नियोजन केले आहे. आषाढीचा सोहळा २५ जुलैला पार पडणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक दिवस आधीच पंढरपुरात येणार आहेत.

२४ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध जिल्ह्यांतील पाच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान, पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे सातबारा उतारे कोरे करण्याचे नियोजन आहे.

‘आषाढी’चे औचित्य अन्‌ शेतकऱ्यांना गोड भेट

शेतकऱ्यांचा आणि गोरगरिबांचा देव म्हणून पंढरीच्या पांडुरंगाची ओळख आहे. आपल्यावरील संकटे दूर व्हावीत, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, या आशेने दरवर्षी लाखो शेतकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीला येतात. हीच संधी साधून राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ जुलैपासून कर्जमाफीचे दोन लाख रुपये जमा करण्याचे नियोजन केले आहे.

३१ जुलैपर्यंत कर्जमाफीचा लाभ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने अडचणीतील बळिराजाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून दोन लाखांची कर्जमाफी दिली. सर्वांत मोठी ही कर्जमाफी असणार आहे. ३१ जुलैपूर्वी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यात निश्चितपणे पैसे जमा होतील.

- दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री

कर्जमुक्ती योजनेची स्थिती

  • अंदाजे लाभार्थी

  • ५६.१३ लाख

  • अपेक्षित रक्कम

  • ४०,००० कोटी

  • पहिल्या टप्प्यातील तरतूद

  • २०,००० कोटी

  • योजनेचा लाभ वितरित

  • २४ जुलैपासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com