esakal | वळणदार अक्षरावर भाळले मुख्यमंत्री; कोल्हापूरच्या सुपुत्राचे केले कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

वळणदार अक्षरावर भाळले मुख्यमंत्री; कोल्हापूरच्या सुपुत्राचे केले कौतुक

वळणदार अक्षरावर भाळले मुख्यमंत्री; कोल्हापूरच्या सुपुत्राचे केले कौतुक

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना समजला जातो. एखाद्या लिपिकाचे प्रशासकीय फाईल वरील हस्ताक्षर पाहून चक्क मुख्यमंत्र्यांनी त्या कर्मचाऱ्याला भेटायला बोलावण्याची अनोखी घटना घडली आहे. कासारवाडी ता.भुदरगड येथील दत्तात्रय बाबूराव कदम मंत्रालयातील गृह निर्माण विभागात लिपिक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांच्या हस्ताक्षराचे कौतूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कदम यांना वर्षा बंगल्या बोलावून घेतले.

कदम काम करत असेलेल्या विभागाची फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात पडली आणि फाईलच्या मुखपृष्ठावर असलेले कोरीव, सुंदर अक्षर पाहून मुख्यमंत्र्यांना कौतूक वाटले. त्यांनी हे अक्षर कोणाचे आहे? अशी मुख्य सचिवांकडे विचारणा केली. त्यांना हे अक्षर गृह निर्माण विभागातील लिपिक दत्तात्रय कदम यांचे असल्याचे समजले. त्यांनी फाईल तशीच बाजूला ठेवत दत्तात्रय यांना भेटायचे असल्याचे, म्हणत त्यांना बोलवायला सांगितले.वर्षा बंगल्यावर बोलावून दत्तात्रत कदम यांच्या वळणदार, सुंदर अक्षराचे मुख्यमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले. शिवाय ही कला जोपासण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील दत्तात्रत कदम गरिबीतून एम.ए, डी.एड पर्यंतचे शिक्षण घेत 2018 ला एम.पी.एस.सी च्या माध्यमातून मंत्रालय लिपिकपदी रुजू झाले आहेत. विद्यार्थी दशेपासूनच नियोजनबद्ध, टापटीप व प्रामाणिकपणे काम करण्याची सवय असल्याचे कदम सांगतात.

हेही वाचा: 'सोमय्यांचा प्रयत्न हाणून पाडणार, मुश्रीफांच्या मागे खंबीर उभारणार'

सोशल मीडिया वर चर्चा...

दत्तात्रय कदम यांच्या हस्ताक्षराचे कौतूक केलेल्याची पोस्ट सध्या फेसबूक, व्हॉट्सअॅप या समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. कदम यांचे हस्ताक्षर असणारी फाईल व त्यांचा मुख्यमंत्र्यांसोबत असणारा फोटो सध्या व्हायरल करत अनेक जण कदम यांना शुभेच्छा देत आहेत.

माझ्या अक्षराचं कायम कौतूक होतं पण मुख्यमंत्री यांची दखल घेतील असं कधी वाटलं नव्हतं. फाईलवचे अक्षर पाहून मा.मुख्यमंत्री साहेबांनी मला बोलावून कौतुक केले हा क्षण माझ्यासाठी आनंददायी व अभिमानास्पद होता.

- दत्तात्रय कदम, लिपिक, मंत्रालय

loading image
go to top