दौंड शुगर ठरला सर्वोत्कृष्ट कारखाना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

राज्यातील यंदाचा २०१८-१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर कारखान्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आज प्रदान करण्यात आला. साखर उतारा, इथेनॉलपासून निर्मिती, गाळप क्षमतेचा वापर अशा विविध कार्यक्षमतेवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या दौंड शुगरला हा पुरस्कार देण्यात आला. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख दोन लाख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुणे - राज्यातील यंदाचा २०१८-१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर कारखान्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आज प्रदान करण्यात आला. साखर उतारा, इथेनॉलपासून निर्मिती, गाळप क्षमतेचा वापर अशा विविध कार्यक्षमतेवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या दौंड शुगरला हा पुरस्कार देण्यात आला. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख दोन लाख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बुधवारी (ता. २५) आयोजित कार्यक्रमात ऊस भूषण, तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व पर्यावरण संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवनी आणि वैयक्‍तिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  

अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे
राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार - पूर्व हंगामी राज्यात पहिला -
 संपत पाटील, वाठार, ता. हातकणंगले, सुरू हंगाम- अजिंक्‍य ठाकूर (पिंपरी, ता. खेड), खोडवा - जगन्नाथ भगत, (ता. कडेगाव, जि. सांगली)

विभागनिहाय ऊस भूषण पुरस्कार - (दक्षिण विभाग) : पूर्व हंगामात पहिला ः अशोक चौगुले (उमळवाड, ता. शिरोळ, जि.कोल्हापूर)

सुरू हंगामात पहिला - नारायण वरुटे (प्रयाग चिखली, ता. करवीर). खोडवा हंगामात पहिला- जवाहर पोतदार, इचलकरंजी (ता. हातकणंगले)

मध्य विभाग - पूर्व हंगामात पहिला- हणमंत बागल (गादेगाव, ता. पंढरपूर), खोडवा हंगाम - भाईदास खैरनार (सायणे, ता. साक्री), जि. धुळे, उत्तर-पूर्व विभाग : खोडवा हंगामात पहिला- नीळकंठ बिरादार, तोंडार, ता. उदगीर, जि. लातूर.

वैयक्तिक पुरस्कार :
उत्कृष्ट विकास अधिकारी -
 सुभाष पाटील, राजारामबापू पाटील कारखाना सांगली.

उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी - नंदकुमार सूर्यवंशी, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना कडेगाव. उत्कृष्ट मुख्य अभियंता ः आशिष चव्हाण, क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कारखाना, कुंडल, जि. सांगली. 

उत्कृष्ट चीफ केमिस्ट - शिवशंकर भोसले सोमेश्वर कारखाना बारामती.

उत्कृष्ट चीफ अकाउंटंट - भानुदास पाटील, विश्वासराव नाईक कारखाना शिराळा.

उत्कृष्ट आसवणी व्यवस्थापक - बळवंत पाटील, अंबालिका शुगर कर्जत.

उत्कृष्ट कार्यकारी संचालक - विजय वाबळे, माळेगाव कारखाना, बारामती.

‘व्हीएसआय’उत्कृष्ट कामगिरीबद्दल कर्मचारी - डॉ. एस. जी. दळवी, वैज्ञानिक टिश्‍यू कल्चर विभाग. राहुल अरगडे, कैलास चोरमले, दिलीप घाडगे इस्टेट विभाग.

सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार - सोमेश्वर साखर कारखाना, बारामती.

सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार - जवाहर साखर कारखाना हुपरी, ता. हातकणंगले.

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, अंबड, जि. जालना.

सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव, ता. आंबेगाव.

सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार - क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल, ता. पलुस, जि. सांगली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daund Sugar proved to be the best factory