Iqbal Kaskar| अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडली; जे. जे. रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडली; जे. जे. रुग्णालयात दाखल

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडली; जे. जे. रुग्णालयात दाखल

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या काल रात्री छातीत दुखू लागल्याने त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इक्बाल कासकर याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इक्बाल कासकर याला शनिवारी दुपारनंतर अचानकपणे त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला तळोजा तुरुंगातून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबधित त्रासामुळे इक्बालला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दाऊदसोबत व्हिओआयपी कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्याचं आपल्या व्यवसायांवर नेहमी लक्ष असंत, अशी माहिती इक्बालने दिली. इक्बालने काल दाऊच्या पाकिस्तानमधल्या 3 घरांची माहिती पोलिसांना दिली.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत.

एनआयएच्या कारवाईनंतर ईडीने मुंबईतील दाऊदशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर, इक्बाल कासकर आणि छोटा शकीलचा नातेवाईकाशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. ईडी दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांची बेकायदेशीर खरेदी आणि हवाला व्यवहारांची चौकशी करत आहे. ईडीने इब्राहिम कासकरचीदेखील चौकशी केली आहे.

Web Title: Dawood Ibrahim Brother Iqbal Kaskar Shifted To Mumbai J J Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..