शरद पवारांचा रामराजेंना फोन अन् अध्यक्षपदाची माळ पाटलांच्या गळ्यात I Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank Election

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.

शरद पवारांचा रामराजेंना फोन अन् अध्यक्षपदाची माळ पाटलांच्या गळ्यात

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत (Satara District Bank Election) अध्यक्ष निवडीवरून रस्सीखेच सुरु होती. जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळं या निवडीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता ताणली होती. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील उर्फ तात्या यांचे पुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: 2023 मध्ये भाजप मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार; अमित शहा

आज सकाळी अकरा वाजता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. सकाळपासूनच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा बँकेच्या आवारामध्ये उपस्थित होते.

Web Title: Dcc Bank Election 2021 Sharad Pawar Elected Nitin Patil As The Chairman Of District Bank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top