बीड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याकरिता सर्वत्तोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.