Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा जपानकडून 'असाही' सन्मान; नरेंद्र मोदींनंतर मिळाला बहुमान

PM Modi Devendra Fadnavis
PM Modi Devendra Fadnavisesakal
Updated on

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून शासकीय अतिथी हा बहुमान मिळाला आहे. हा मान यापूर्वी देशाचे विद्यमान पंतप्रधान तथा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळाला होता.

जपान सरकारने देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी असा देर्जा देऊन आमंत्रित केलं आहे. फडणवीस येत्या २० ऑगस्टपासून जपानच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना २०१३ साली हा सन्मान मिळाला होता.

PM Modi Devendra Fadnavis
वाघा-अटारी बॉर्डरवर भारतीयांची तुडुंब गर्दी, बिटिंग रिट्रीट कार्यक्रमात महिला जवानांचाही समावेश

मागे देवेंद्र फडणवीसांनी मॉरशिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. हा आपल्यासाठी बहुमान असल्याचं त्यांनी नमूद केलेलं. आता जपान सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. जपानच्या दौऱ्यामध्ये फडणवीस हे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करतील.

जपानमध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. तसेच विदेशी गुंतवणूकदारांसमवेत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी हा दौरा महत्त्वाचा समाजाला जातोय. विशेष म्हणजे सोनी, एनटीटी, समिटोमो यासारख्या नामवंत कंपन्यांसोबत फडणवीसांच्या बैठका घेतील.

PM Modi Devendra Fadnavis
Nuh Violence : नूह हिंसाचार भडकवल्या प्रकरणी बिट्टू बजरंगीला अटक; फरीदाबाद येथून घेतलं ताब्यात

जपान दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो प्रकल्पांना भेटी देऊन कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहेत. दि. २० ते २५ ऑगस्ट असा फडणवीसांचा दौरा असणार आहे. फडणवीसांना शासकीय अतिथी असा विशेष दर्जा मिळाल्याने त्यांचं कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com