Latest Marathi News | राज्य नाट्य स्पर्धा प्रवेशिकेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Natya Spardha

राज्य नाट्य स्पर्धा प्रवेशिकेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

नाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे यंदाची राज्य नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राज्यातील दहा केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. (Latest Marathi News)

हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर होईल. तसेच, ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी १ जानेवारी २०२३पासून प्रत्येकी एका केंद्रावर होणार आहे. या शिवाय १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीदेखील १ जानेवारीपासून होणार आहे. तर, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार आहे. दरम्यान, नाट्य स्पर्धेसाठी संबंधित संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे अर्ज पाठवावा.

हेही वाचा: 'गॉसीप आणि बरंच काही' सोनी मराठीची दमदार मालिका..

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच, गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम www.mahasanskruti.org या वेबसाइटवर उपलब्ध होतील. आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशिका १५ सप्टेंबरपर्यंत पाठवाव्यात. मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- ३२ या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

हेही वाचा: 'मिस यू पट्या!' दिवंगत प्रदीप पटवर्धन आणि गिरगावची दहीहंडी,आहे खास कनेक्शन

Web Title: Deadline For State Drama Competition Rajya Natya Spardha Entry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikmarathi drama