esakal | शेतकऱ्यांनो, पीक विमा योजनेबाबत कृषी आयुक्तालयाने जाहीर केली महत्त्वाची सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

बँक आणि आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही.

शेतकऱ्यांनो, पीक विमा योजनेबाबत कृषी आयुक्तालयाने जाहीर केली महत्त्वाची सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. बँक आणि आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढविणे केंद्र सरकारच्या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये ३१ जुलैपर्यंत विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.

प्रशासक नियुक्तीच्या चक्रव्यूहात अडकलं राज्य सरकार; कोण भेदणार हे चक्रव्यूह?​

या संदर्भात नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)