कोरोनाबाधितांच्या मृत्यूने राज्यात हाहाकार! वाचा कोरोनासंदर्भातील राज्यातील आजची आकडेवारी

मिलिंद तांबे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राज्यात आज तब्बल 322 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 15,316 वर पोहोचला आहे.

मुंबई : राज्यात आज तब्बल 322 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 15,316 वर पोहोचला आहे. तर, राज्यात आज दिवसभरात 9,601 नव्या रुग्णांची नोंद झाली. दिलासादायक म्हणजे आज  10,725 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4,31,719 झाली आहे.

रुग्णवाहिकेअभावी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तब्बल तासाभरानंतर आली रुग्णवाहिका....

राज्यात सध्या 1,49,214 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 2,66,883 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61.82 % एवढे झाले आहे. आज राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे परिमंडळात 128, पुणे मंडळात 89, नाशकात 42, औरंगाबाद मंडळात 19, कोल्हापूरात 18, लातूर मंडळात 16, अकोला मंडळात 7 आणि नागपूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर, इतर राज्यातील एका मृत्यूचाही यात समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.55 % एवढा आहे.   राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 21,94,943 नमुन्यांपैकी 4,31,719 (19.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,08,099 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 38,947 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

--------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of corona increase in state ! Read todays state statistics regarding corona