'लाँग मार्च'मधील शेतकऱ्याचा मृत्यू; प्रकृती खालावल्याने रुग्णालयात केलं होतं दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kisan Long March

'लाँग मार्च'मधील शेतकऱ्याचा मृत्यू; प्रकृती खालावल्याने रुग्णालयात केलं होतं दाखल

मुंबईः शेतकरी, कष्टकरी आणि अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी लाँग मार्च काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य झाल्याचं सांगून मार्च थांबवण्याची मागणी केलीय. मात्र आंदोलक ठाम आहे. याच दरम्यान, मार्चमधील एका शेतकऱ्याची प्रकृती अचानलक खालावली. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

लाँग मार्च मधील एका शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केलं परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

हेही वाचाः ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

पुंडलिक जाधव हे माहुडी (तालुका दिंडोरी, जि.नाशिक) येथील रहिवासी होते. अत्यवस्थ वाटल्याने शहापूर उपजिल्हा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेतकरी, कष्टकरी, अंगणवाडी सेविका यांचा एक लाँगमार्च मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज सभागृहात बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य असल्याचं म्हटलं असून मार्च मागे घेण्याची विनंती केली.

शेतकरी लाँग मार्च मागे घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना अवाहन केले होते. मात्र यानंतर देखील सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत लाँग मार्च मागे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत लाँगमार्च वासिंदमध्येच मुक्कामी असणार आहे.

टॅग्स :Farmer