अधिवासाच्या लढाईत वाघाचा मृत्यू, गेल्या नऊ महिन्यांत राज्यात तब्बल एवढे मृत्यू  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Death of a Tiger in a battle of Habitat

उमरेड -पवनी - कऱ्हाडला अभयारण्यातील कुही परिक्षेत्रातील वनखंड क्र. 365 मध्ये एका वाघाचा मृतदेह नियमित गस्तीदरम्यान शनिवारी (ता. १२) सायंकाळी वन कर्मचाऱ्यांना आढळला होता. जंगलात अंधार झाल्याने त्या वाघाचे शवविच्छेदन रविवारी सकाळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात आले.

अधिवासाच्या लढाईत वाघाचा मृत्यू, गेल्या नऊ महिन्यांत राज्यात तब्बल एवढे मृत्यू 

नागपूर ः उमरेड-कऱ्हाडला-पवनी अभयारण्यातील कुही परिक्षेत्रामध्ये एका वाघाचा मृत्यू आपसातील लढाईत झाल्याचे प्राथमिक अहवालातून उघडकीस आले आहे. शवविच्छेदनात मृत झालेल्या वाघाच्या अंगावर जखमांच्या खुणा आढळून आल्याने हा निष्कर्ष काढण्यात येत आहे. आत्तापर्यंत गेल्या आठ महिन्यांत १४ वाघांचा मृत्यू विविध कारणांमुळे झालेला आहे. 

"नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

उमरेड -पवनी - कऱ्हाडला अभयारण्यातील कुही परिक्षेत्रातील वनखंड क्र. 365 मध्ये एका वाघाचा मृतदेह नियमित गस्तीदरम्यान शनिवारी (ता. १२) सायंकाळी वन कर्मचाऱ्यांना आढळला होता. जंगलात अंधार झाल्याने त्या वाघाचे शवविच्छेदन रविवारी सकाळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात आले. याकरिता डॉ. चेतन पातोन्ड, डॉ. सैय्यद बिलाल, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. इलाही तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी अनिल दशहरे, मुख्य वन्यजीव संरक्षकांचे प्रतिनिधी रोहित कारू, विभागीय वन अधिकारी, बोर, तसेच क्षेत्र संचालक पेंच हे उपस्थित होते. 

अंगावर जखमांच्या खाणाखुणा 

हा वाघ टी १७ या वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी दोन वर्षांचा नर असल्याचे आढळून आले. शवविच्छेदनादरम्यान अंगावर जखमांच्या खाणाखुणा आढळून आल्या आहेत. याशिवाय इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अनुषंगाने या वाघाचा मृत्यू आपसातल्या लढाईत झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. या भागात अलीकडेच ब्रम्हपुरी येथील टी २२ या प्रौढ वाघाचे आगमन झालेले आहे असे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प यांनी कळविले आहे. 
 

मानवी हस्तक्षेप व्हावा कमी 

वाघांची संख्या वाढत असताना त्याच्या आश्रयस्थानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच वाघांना इतरत्र हालविण्याचा विचार सरकार करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अतिशय सावध भूमिका घेत मनुष्याप्रमाणे वाघांनाही स्थलांतरित करताना त्यांच्याही विचार करावा, असा सल्ला दिला आहे. मात्र, आता वाघांच्या भ्रमणमार्गावर अधिक भर देऊन त्यातील मानवी हस्तक्षेप कमी करणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे. 
 

Web Title: Death Tiger Battle Habitat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top