esakal | धक्‍कादायक ! कर्जबाजारीपणामुळे हॉटेल व्यावसायिकाची पत्नी व दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी 
sakal

बोलून बातमी शोधा

aatmhatya

आत्महत्या हा पर्याय नाही 

जीवनात कितीही संकटे आली तरी आत्महत्या हा त्यावर पर्याय नाही. आजचा भिकारी उद्याचा श्रीमंत व्यक्‍ती होऊ शकतो. अपयशामुळे मुलांसह पत्नीला व स्वत: आत्महत्या करणे खूपच ह्दयद्रावक आहे. अमोल जगतापने सर्वप्रथम पत्नीला आणि त्यानंतर मुलांना गळफास देऊन शेवटी स्वत:ही आत्महत्या केली. त्यानुसार अमोल जगतापविरुध्द गुन्हा दाखल होईल. घटनास्थळी चिठ्ठी मिळाली असून त्यानुसार तपास केला जाईल. 
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त 

धक्‍कादायक ! कर्जबाजारीपणामुळे हॉटेल व्यावसायिकाची पत्नी व दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कर्जबाजारीपणाला कंटाळून हॉटेल व्यावसायिकाने पत्नी आणि दोन चिमुकल्यांना गळफास देऊन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापुरातील जुना पुना नाका येथील हांडे प्लॉट येथे सोमवारी (ता. 13) घडली आहे. अमोल अशोक जगताप (वय 37), मयुरी अमोल जगताप (वय 27), आदित्य (वय 7) आणि आयुष (4) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. 


अमोल जगताप हा जुना पुना नाका येथील हांडे प्लॉटमध्ये राजपूत यांच्या घरात भाड्याने रहात होता. सोलापूर: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीजवळ (ता. उत्तर सोलापूर) गॅलेक्‍सी हॉटेल व बिअरबार तो आणि त्याचा भाऊ चालवत होता. त्याच्या घरात दोरीला लटकलेले मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर फौजदार चावडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्त बापू बांगर यांनीही त्याठिकाणी भेट दिली. त्यावेळी घरात अमोल व त्याच्या दोन मुलांचे मृतदेह लटकत होते. तर पत्नी मयुरी ही पलंगावर पडून होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करुन परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गायकवाड, सिव्हिलमधील लादेन यांच्या मदतीने मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. त्याच्या घराची तपासणी केली असता एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली. तर मयुरी हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले. 

आत्महत्या हा पर्याय नाही 

जीवनात कितीही संकटे आली तरी आत्महत्या हा त्यावर पर्याय नाही. आजचा भिकारी उद्याचा श्रीमंत व्यक्‍ती होऊ शकतो. अपयशामुळे मुलांसह पत्नीला व स्वत: आत्महत्या करणे खूपच ह्दयद्रावक आहे. अमोल जगतापने सर्वप्रथम पत्नीला आणि त्यानंतर मुलांना गळफास देऊन शेवटी स्वत:ही आत्महत्या केली. त्यानुसार अमोल जगतापविरुध्द गुन्हा दाखल होईल. घटनास्थळी चिठ्ठी मिळाली असून त्यानुसार तपास केला जाईल. 
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त 


आत्महत्येपूर्वी केला भावाला फोन 
लॉकडाउनमुळे मार्चपासून हॉटेल बंदच होते. मात्र, अमोलच्या डोक्‍यावर खासगी कर्जाचा बोजा वाढला होता. कर्जासाठी खासगी सावकारांनी त्याच्यामागे तगादा लावला होता. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होती. पत्नी आणि दोन मुलांना गळफास दिल्यानंतर अमोलने त्याच्या भावाला फोन केला आणि तिघांना संपवले असून आता मी आत्महत्या करतोय, असे सांगितले. भाऊ, नातेवाईक वकिलासह घटनास्थळी येईपर्यंत अमोलने गळफास घेऊन स्वत:ला संपविले होते. घटनास्थळी पोलिसांना मोबाइल व चिठ्ठी सापडली असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले.