आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा- दीपक केसरकर

शिवसेनेचे नेते, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरू आहे.
Deepak Kesarkar Latest Marathi News
Deepak Kesarkar Latest Marathi NewsDeepak Kesarkar Latest Marathi News

शिवसैनिक दुर गेले म्हणून यात्रा सुरू केल्या. याआधी अशा गाठीभेटी घेतल्या नाहीत. वेगवेगळ्या यात्रा काढतायत. असे म्हणत शिंदे गट प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे नेते, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.(Deepak Kesarkar aaditya thackeray uddhav thackeray)

शिवसेनेचे नेते, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरू आहे. त्यांची ही यात्रा आज मनमाडमध्ये येणार आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत आदित्या ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली.

आदित्य ठाकरे तरुण आहेत. कसे वागावे बोलावे याचे उद्धव ठाकरेंचे उदाहरण घ्यावे. असा सल्ला केसरकर यांनी यावेळी आदित्य यांनी दिला. तसेच, आदित्य ठाकरे निम्म्या वयाचे आहे. मात्र, ते आले की आम्ही खुर्चीवरुन उठतो कारण त्यांच्या आजोबांना आम्ही मान देतो. असेही केसरकर यावेळी म्हणाले.

शिवसेनेचे नेते, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरू आहे. यादरम्यान त्यांनी ‘शिवसैनिक असते, तर हिमतीने उभे राहिले असते. आम्ही उठाव व बंड केले असे ते म्हणत आहेत. पण, तो बंड-उठाव नव्हता. ती गद्दारी होती. उठाव करण्यासाठी हिंमत लागते. बंड करण्यासाठी ताकद लागते. ते महाराष्ट्रात थांबले असते. सुरत आणि तेथून गुवाहाटीला पळून गेले नसते. अशी टोलेबाजी शिंदे गटावर केली होती.

आदित्या ठाकरेंच्या या टोलेबाजी नंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद उत्तर दिले आहे. बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून तुम्ही शिवसैनिक आहात पण आमच्या रक्तात बाळासाहेबांनी शिवसेना भिनवली आहे. असे म्हणत केसरकरांनी आम्हीच खरे शिवसैनिक आहोत असा दावा पुन्हा एकदा केला.

काय म्हणाले केसरकर?

कट्टर शिवसैनिकांची बदनामी कशाला करता असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जे लोक या नेत्यांबद्दल बोलतात त्यांनी पक्षासाठी तितकं काम केलं आहे. ह्यांनी आयुष्य शिवसेनेसाठी वेचलं. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली त्यांचा अपमान केला हे मनाला लागत आहे.

शिवसेना ही एका नेत्यामुळे उभी झाली. ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. त्यामुळे आज शिवसैनिकांचा अपमान होता कामा नये. आणि यांच्या रक्तामध्ये शिवसेना नाही का? असा सवाल जनतेने विचारला पाहिजे. संजय राठोड लग्न ठरलं तर शिवसेना साठी तुरुंगात होते. सासरे म्हणाले तुम्ही नाही आले तर तुमच्या फोटो शी लग्न लावेन. असे राठोडांचे उदाहरण देत याला म्हणता शिवसेना असे केसरकर यावेळी म्हणाले.

भुमरे साहेब कितीवेळा जेलमध्ये गेले. पाजवेळी आमदार झाले. पण त्यांनी कधी मंत्रीपद मागितले नाही. एक वर्ष शिवसेनेसाठी जेलमध्ये होते. आणि मग त्या शिवेसैनिकाच्या पक्षनिष्ठेवर शंक घेत असाल तर ते आमच्या मनाला लागलं आहे. आम्ही कधी तुमच्याबद्दल अनादाराने बोललो आहे का? मग तुम्हीदेखील बोलू नका.

शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपदाच वचन दिलं होत ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांनी त्यावेळी बंड पुकारलं का. आदित्या ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, शिंदे साहेबांना उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावले. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपद सोडतो आणि तुम्हाला देतो. त्यावेळी शिंदेसाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले. हा किस्सा सांगत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. हे दिसते.

त्यावेळी शिंदे यांनी आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपशी युती करा त्याचे तुम्ही मुख्यमंत्री रहा अशी विनंती केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली नव्हती. मग त्यांची बदनामी का करताय असा सवाल केसरकरांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत. म्हणून प्रसंगी आमची आमदारकी पणाला लावून आम्ही शिवसेनेत राहिलो. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतो. काल राहुल शेवाळेंनी सांगितल. की पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची युतीसंदर्भात चर्चा सुरु होती. तसे जर झाले असते तर, अडिच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद भाजपला द्याव लागलं असतं. त्यावेळी त्यांना कोण म्हटलं असत का बाळासाहेबांच्या पुत्राला खुर्चीवरुन खाली उतरवल? तुम्ही जे करणार होता त्याप्रमाणे ते पद जाणार होत भाजपकडे. आज शिंदेंनी लढा दिला म्हणून पाच वर्ष शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर राहू शकते. ही वस्तुस्थिती असल्याचे केसरकरांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com